१४.६.१५

नमस्कार! मला नट व्हायचंय…

काही वर्षांपासून अनेक फोन येतात, फेसबुक वर वगैरे मेसेज येतात - 'मला नाटकात घ्या.' किंवा 'मला नट व्हायचंय'! याहून भारी म्हणजे असंही म्हणणारी लोकं भेटतात - 'सध्या जरा वेळ फ्री आहे. जरा ३ महिने काम कमी आहे. या तीन महिन्यात कुठलं नाटक करता येईल का?' किंवा 'नोकरी शोधतोय, ती मिळेपर्यंत करतो काहीतरी तुमच्याबरोबर'.

या लोकांना काय म्हणायचं हेच काळत नाही!कसं सांगायचं?तुमची सुरुवात, तुमच्या विचारांचा, इच्छेचा उगमच चुकीचा आहे!अभिनय काय ३ महिन्यात येणारी गोष्ट आहे का?किंवा नाटक काय तुम्ही फ्री आहात म्हणून करायचं?मग कसे टिकणार तुम्ही इथे?आणि हीच सुरुवातीला तुमची निष्ठा असेल तर पुढे जाऊन काय कराल?आणि अभिनय करणं इतकं सोप्पं वाटतं का?घरी बसून, जेवत जेवत समोरच्याला टी.वी. वर अभिनय करताना बघून, सगळंच सोप्पं वाटतं. आपण नाही का क्रिकेट खेळाडूंना शिव्या घालत जेव्हा ते हरतात?तसंच काहीसं.

याच विचारांमध्ये होतो आणि मला नाटकाची कार्यशाळा घ्यायला बोलावलं. मी ही लगेच 'हो' म्हणालो. कारण यानिमित्ताने मी जे काही शिकलो ते पुन्हा शिकायला मिळेल. कोणालातरी काहीतरी सांगायचं म्हणजे आपला अभ्यास चोख पाहिजे!आणि या कार्यशाळेच्या निमित्ताने तो अभ्यास पुन्हा करायला मिळेल. मी सत्यदेव दुबेंना माझा गुरु मानतो. त्यांची एक कार्यशाळा १० वर्षांपूर्वी केली होती. आणि त्यानंतर या न त्या कारणाने पुढची ७ वर्ष त्यांच्याबरोबर भेटी होत होत्या, चर्चा होत होती. या  कार्यशाळेत त्यांच्याकडून जे शिकलो ते मुख्यतः शिकवायचं असा निश्चय केला आणि तयारीला लागलो. त्यांची कार्यशाळा सुरु करायच्या आधी दुबेजी काही लेख आणि कविता द्यायचे. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याचं ते सगळं तोंडपाठ पाहिजे म्हणजे पाहिजेच! काही लेख आणि कविता शोधू लागलो पण एक लेख मला काही केल्या सापडेना. दुबेजींनी स्वतः तो लिहिला होता. शेवटी इकडे-तिकडे चौकशी केली आणि तो सापडला! तो वाचल्यावर आपसूक डोळ्यात पाणी आलं. त्यांनी जे फार पूर्वी लिहिलं आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलंच पाहिजे असं वाटलं.

दुबेजींवर जितकं लिहावं तितकं कमीच आहे. तरी त्यांच्यवर एखाद-दुसरा लेख लिहीनच. पण हा लेख मुख्यतः त्यांनी मांडलेला, साधा, सरळ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरा विचार, यावर आहे. नट-नटी व्हायचं म्हणजे काय काय लक्षात ठेवायचं हे लोकांना कळेल. फक्त संवाद माहिती असणं आणि ते चार चौघांमध्ये म्हणता येतात इतकं पुरेसं नाहीये!त्याला जी तपश्चर्या लागते, याचं महत्त्व हा लेख सांगतो. आणि फक्त तिथे थांबत नाही. तर यश-अपयशासाठी काय काय गरजेचं आहे हे ही सांगतो.

हा त्यांचा विचार मी येत्या कार्यशाळेत सर्वांपर्यंत पोहोचवू शकलो तरी थोड्या-फार प्रमाणात यशस्वी झालो असं समजेन.


हा तो लेख -

‘आज हिंदुस्तान का हर नौजवान ऐक्टर बनना चाहता है पर यह इसे कौन बताएगा कि ऐक्टर बनना हर किसी के बस कि बात नही कौन समझाएगा उसे कि ऐक्टर बनने के लिए प्रतिभा जरूरी है, टॅलेंट रूप रंग चाहे कितना भी अच्छा हो प्रतिभा के बगैर कोई ऐक्टर नही बन सकतारूप रंग है प्रतिभा है तो भी जी तोड़ मेहनत करनी पड़ती है ऐक्टर बनने के लिए जी तोड़ मेहनत के बाद भी बुलंद तकदीर लगती है स्टार बनने के लिए अगर तकदीर ने साथ दिया और आप स्टार बन भी गए, तब भी स्टार बने रहने के लिए और भी कड़ी मेहनत करनी पड़ती है याने कड़ी मेहनत से छुटकारा नही इतना ही नही यह भी समझना पड़ेगा कि कड़ी मेहनत किस दिशा में करनी चाहिए नाच सकना आज एक अहम जरूरत है पर क्या ताल पर आपका बदन थिरकता है क्या ताल रो ताल मिला सकते है आप प्ले बॅक नाम की चीज आज जरूर है पर क्या आप पर्दे पर आभास पैदा कर सकते है कि आप ही है जो गाना गा रहे है फिर जो उछल कूद,उठापटक,मुक्केबाजी आप पर्दे पर देखते है आपके बस की बात है क्या?अपनी जिंदगी में आप यह सारा कुछ आसानी से कर लेते है लेकिन पर्दे पर करने के लिए आपको वही चीज दोबारा सीखनी पड़ेगी आप जो कुछ भी अपनी जिंदगी में आसानी से कर लेते है - साफ बोलना, मुस्कुराना, दूसरे तक अपनी बात पहुँचा पाना, रोना, गुस्सा होना, डरना-डराना यह सब नये सिरे से सीखना होगा और इस का ख्याल रखना होगा कि यह सारा कुछ स्वाभाविक दिखे - नैचरल दिखे यह जो सारा कुछ उपर लिखा है इसे पूरी तरह याद कर लो फिर कम से कम दो सौ मर्तबे इसे बोलो - जोर से आईने के सामने के अपनी नजर से नजर मिलाकर - यकीन मानो यह एक अच्छी शुरुआत होगी - बेस्ट ऑफ़ लक

पं. सत्यदेव दुबे





२ टिप्पण्या:

  1. छान लेख आहे. वाचून आनंद झाला की तुला सत्यदेव दुबे यांचे मार्गदर्शन मिळाले. असेच लेख लिहीत राहवे, ज्यामुळे आम्हाला तुझ्या कामातील व दैनंदिन जीवनातील अनुभवमुळे शिकायला मिळेल.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान.. खूपच प्रेरणा देणारा लेख आहे

    उत्तर द्याहटवा